हार्वर्ड बिझनेस रिव्यू ( A Harvard Business Review )
योग्य भागीदारासोबत काम करणे, सहकार्य करणे तुमच्यासाठी उद्दिष्टप्राप्ती करण्यात जास्त फायदेशीर होऊ शकते. ही बाब एकट्याने उद्दिष्टप्राप्ती करण्याच्या दृष्टीने शक्य नाही. परंतु, जर तुमच्यात आणि संभाव्य सहकाऱ्यांमध्ये आधीपासूनच घनिष्ठ संबंध नसतील तर त्यांना सहकार्यासाठी तयार करणे थोडे कठीण होऊ शकते. अशा स्थितीत तुम्हाला हे सिद्ध करावे लागू शकते की, ही भागीदारी तुमच्यासाठी किती महत्त्वाची आहे. तसे करण्यासाठी तुम्हाला आपली मूल्ये समोर आणावी लागतील. खालील पद्धती त्यासाठी यशस्वी ठरतील.
1) कठोर मेहनत करण्याची तयारी
जर संभाव्य भागीदाराची प्रतिष्ठा तुमच्यापेक्षा खूप जास्त असेल किंवा काही अंशी खूप मोठी असेल तर तुम्ही अधिक मेहनत करण्याची तयारी दाखवू शकता. हे सहकार्य तुम्हाला अशी संधी देऊ शकत असेल तर ते तुम्ही एकटे साध्य करू शकत नाहीत. त्यामुळे अतिरिक्त कष्ट घेणेही तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते.
2) ज्ञान आणि प्रावीण्य अमूल्य सिद्ध होतील
तुमच्याकडे विशिष्ट विषयात खोल संशोधन केले असेल तर तुमच्याकडे खास वैशिष्ट्य आहे. त्यामुळे हा गुण तुमच्या प्रस्तावाला अधिक आकर्षक बनवू शकतो. विशेष प्रक्रियेची खोल समज असेल आणि दुसऱ्याला त्याची माहिती नसेल तर तुम्ही अमूल्य सहकारी ठरू शकता.
3) कनेक्शन आणि नेटवर्क फायद्याचे ठरेल
तुमचे सामाजिक नेटवर्कही खूप मूल्यवान ठरू शकते. उदाहरणार्थ, तुम्ही आधीच्या एखाद्या कंपनीत काम केलेले असेल, कामाचा अनुभव असेल आणि तुमचे सहकारी बदल करू इच्छित असतील तर त्या स्थितीमध्ये तुम्ही त्या कंपनतील कर्मचाऱ्यांसाठी खूप महत्त्वपूर्ण सहकारी सिद्ध होऊ शकता.
4) फंडिंगपर्यंत पोहोचणे एकमेव उपाय नाही
प्रत्यक्षात फक्त निधीपर्यंत पोहोचणे एकमेव पद्धती असू शकत नाही, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांना आपल्याकडे सहकार्यासाठी आकर्षित करू शकता. अनेक योजनांसाठी तुमच्याकडे स्पष्ट अटींसह एखादी डील निश्चित असेल तर त्यांचा होकार प्राप्त करणे अपेक्षेपेक्षा खूप जास्त सोपे ठरू शकते.
5) प्रतिष्ठा आणि प्रतिमा कामाला येईल
एखादा व्यक्ती प्रसिद्ध आणि सन्मानित आहे, अशा स्थितीत त्या व्यक्तीसोबत सहकार्य केल्यास त्यांच्या प्रतिष्ठेचा फायदा तुमच्या प्रोजेक्टला मिळू शकतो. हे दोन्ही बाजूने काम करू शकते. तसेच ज्येष्ठ सहकाऱ्याने तरुण व्यक्तीसोबत काम केल्यास त्यांना नवीन पिढीत ओळख आणि आधुनिक छबी प्राप्त होऊ शकते.
Leave a Reply